3 May 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते | चंद्रकांत पाटील म्हणतात मी परत जाईन - उपमुख्यमंत्री

Deputy CM Ajit Pawar, BJP leader Chandrakant Patil

पुणे, २६ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

“सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,” असं अजित पवारांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातून तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे स्थानिक भाजप उमेदवार मेधा कुलकर्णी नाराज झाल्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं.

“तुम्ही इथे आलात आणि आमदार झालात. तुमच्यामुळे इथल्या आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. जनतेने निवडून दिलंय सेवा करायला आणि तुम्ही परत जायची भाषा करता. मग इथं आलातच कशाला?”, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil has announced that he will return to Kolhapur. Chandrakant Patil made this statement at a function held in the presence of Devendra Fadnavis in Pune. Deputy Chief Minister Ajit Pawar has lashed out at his statement.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar slams BJP leader Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x