1 May 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार | शिवसेनेकडून केंद्राशी पत्र व्यवहार

Mumbai central station, renaming proposal, Shivsena, MP Arvind Sawant

मुंबई, ६ जानेवारी: राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून अनेक ठिकाणांची नावं बदलण्याची मागणी होत आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी राज्यात राजकरण सूरू आहे. आता यात मुंबई सेंट्रल स्थानकाचीही भर पडली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. त्यावर “गेल्या 6 वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना पत्र लिहून त्यात राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं.

केंद्राकडून प्राथमिक मान्यता मिळायला हवी होती. ती मिळाली नसल्याचं त्यांना पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यावर मंगळवारी राज्यमंत्र्यांनी पत्र पाठवून प्रक्रिया सुरु असल्याचं म्हटलं आहे. आता आपण वाट पाहत आहोत. फेब्रुवारीत जयंतीपूर्वी मंजुरी मिळावी”, अशी अपेक्षा खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: There is a demand for renaming of many places in the state. Politics is underway in the state to change the name of Aurangabad. Now Mumbai Central station has also been added. Shiv Sena MP Arvind Sawant has informed that Mumbai Central station will be renamed as ‘Nana Shankarsheth Terminus’.

News English Title: Mumbai central station renaming proposal sent to union government says Shivsena MP Arvind Sawant news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x