15 December 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या | मंदिरातील पुजाऱ्यावरही गुन्हा

Murder, gang rape, Uttar Pradesh Badaun

लखनऊ, ६ जानेवारी: उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय.

उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात असलेल्या उघैतीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. ५० वर्षीय महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची. ३ जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं. शवविच्छेदन अहवालातून महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याचं निष्पन्न झालं आहे. शवविच्छेदनात आंगनवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या अत्याचारांचा पर्दाफाश झाला. या अहवालात महिलेच्या शरीरावर तसंच खासगी अंगावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं. सोबतच खासगी अंगात लोखंडी सळी घुसवण्याचाही क्रूरपणा यातून समोर आला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी पुजाऱ्याने बलात्कार करून खून केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला, असं पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सोमवारी सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.

 

News English Summary: A 50-year-old Anganwadi worker was brutally murdered after being gang-raped in Badaun, Uttar Pradesh. The woman was beaten after the gang rape. Shockingly, an iron rod was inserted into the body of the victim.

News English Title: Murder after gang rape in Uttar Pradesh Badaun news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x