4 May 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

आ. प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त | सोमैयांची माहिती

ED confiscated, Shiv Sena MLA Pratap Saranaik

ठाणे, १० जानेवारी: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची 100 कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टिटवाळा गुरुवली येथील जमीनीच्या ठिकाणी भाजप नेते सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, शक्तीवान भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. एनईसीएलच्या 100 कोटीच्या घोटाळ्याच्या रक्कमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईटीने जप्त करण्याची नोटिस 2014 सालीच काढली होती. आत्ता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईटीने केली आहे. त्याची नोटीसच सोमय्या यांनी माध्यमांना सादर केली.

पीएमएलए कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे. Prevention of Money Laundering Act, 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण ( Trespassing Prohibited) करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये”, असं या बोर्डावर ईडीने लिहिलं असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

 

News English Summary: BJP leader Kirit Somaiya has claimed that the ED confiscated 78 acres of land belonging to Shiv Sena MLA Pratap Saranaik. He also said that Sarnaik owns land worth Rs 100 crore at Guruwali in Titwala.

News English Title: ED confiscated 78 acres of land belonging to Shiv Sena MLA Pratap Saranaik news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x