3 May 2024 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

सोमैयांची राजकीय फुगडी | आरोप करणाऱ्या महिलेसोबत D. N. नगर पोलीस ठाण्यात

BJP leader Kirit Somaiya, D N Nagar police Station, Complaint Renu Sharma

मुंबई, १४ जानेवारी: बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन त्यासंदर्भातील चौकशी तत्काळ सुरु करण्यात यावी.

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार देणारी महिला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रेणू शर्मा असं या महिलेचं नाव असून ती डी.एन. नगर पोलीस ठाण्यात जबाब दाखल करण्यासाठी पोहोचली आहे. डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या देखरेखीखाली जबाब नोंदवला जाणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. याआधी रेणू शर्मा हीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात, धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेची भेट घेणार आहेत. संबंधित पोलिसांशीही चर्चा करणार असून मुंडेंच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणारी महिला सध्या डीएन नगर विभाग सहायक आयुक्त (एसीपी) यांच्या समोर आपला जबाब नोंदवित आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leader Kirit Somaiya d. N. At the Nagar police station, Dhananjay Munde will meet the woman who allegedly raped him. The woman, who had lodged a rape complaint against Munde, is currently filing her reply before the DN Municipal Division Assistant Commissioner (ACP).

News English Title: BJP leader reached D N Nagar police Station to help Complaint Renu Sharma news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x