पॅरिस : फ्रेंच ओपन २०१८ च्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करत रोमानियाची सिमोना हालेपनं ठरली यंदाची फ्रेंच ओपन २०१८ ची विजेती. याआधी सिमोना हालेपनं तब्बल तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सुद्धा तिला वारंवार विजेते पदाने हुलकावणी दिली होती.
सिमोना हालेपनंच हे पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याची तिची इच्छा अखेर आज प्रत्यक्ष पूर्ण झाली. सामन्यातील पहिला सेट गमावून सुद्धा तिने अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला.
सिमोना हालेपनं हिने दुसरा सेट जिंकला आणि नंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि नंतर तिने अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सला पुढे जाण्याची संधीच दिली नाही आणि अखेर सामना जिंकत फ्रेंच ओपन २०१८ विजेते पदावर स्वतःच नाव कोरल.
