29 April 2024 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

पुलावामातील शहिद CRPF जवानांचे बॅनर मोदींच्या सभा मंचावर होते | लोकसभा २०१९

PM Narnedra Modi, Banner, CRPF shahid jawan, Loksabha Election 2019

नवी दिल्ली, १८ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

दरम्यान, पुलावामातील हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभा मंचावर वापरले होते हा देखील चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे पुलवामा हल्ला आणि त्यानंतरचा बालाकोट स्ट्राईक लोकसभा निवडणुकीपूर्वी आखला गेलेला प्लान होता अशी शंका यापूर्वीच विरोधकांनी व्यक्त केली होती. आता अर्णबच्या लीक चॅटमुळे अनेकांच्या शंका खऱ्या ठरवल्याचे म्हटले जातं आहे. त्यामुळे भाजप पूर्णपणे अडकल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

 

News English Summary: A shocking revelation has surfaced after a 500-page document of Republic TV’s Arnab Goswami’s WhatsApp conversation was leaked on social media in the wake of the TRP scandal. In the related chat, Goswami’s closeness to the Prime Minister’s Office and members of the ruling government, the TRP’s inclination towards him and his attempts to get help from the BJP government and much more have come to the fore.

News English Title: PM Narnedra Modi was used banner of CRPF shahid jawan in Loksabha Election 2019 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x