4 August 2020 2:35 PM
अँप डाउनलोड

गरिबी, महागाई व बेरोजगारीवरून लोकांना विचलित करण्यासाठी 'एक देश एक निवडणुकीचा' घाट

Narendra Modi, Mayawati

नवी दिल्ली : एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. परंतु या बैठकीपासून विरोधी पक्षाचे नेते दूरच राहणे पसंत करत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत हे निश्चित आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तर चंद्राबाबू नायडू सुद्धा सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असं समजतं. आपचे नेते अरविंद केजरीवाल सदर बैठकीला प्रतिनिधी पाठवला जाईल असं आधीच स्पष्ट केलं आहे.

मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायचं की नाही यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहावं की नाही यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

मायावती यांनी ट्विट करत ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका देशासाठी आणि लोकशाहीसाठी घटक असल्याचं ट्विट केलं आहे. ईव्हीएमवरील मतदारांचा विश्वास उडाला आहे. जर या समस्येवर बैठक बोलविली असती तर मी आर्वजून या बैठकीला उपस्थित राहिले असते. परंतु एक देश एक निवडणूक ही चर्चा खऱ्या अर्थाने केवळ गरिबी, महागाई, बेरोजगारी, वाढता हिंसाचार अशा ज्वलंत राष्ट्रीय समस्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी पुढे केली जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x