28 April 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

भाजप-सेनेच्या सरकारमुळे नाही, तर मनसेमुळे मुंबईत पेट्रोलचे भाव ४ रुपयांनी कमी

मुंबई : काही महिन्यांपासून संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ झाल्याने सामान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पेट्रोलचे भाव कमी करण शक्य नसल्याचे म्हटले असताना राज ठाकरेंच्या मनसेकडून मुंबईकरांना एका दिवसाचा का होईना, पण दिलासा देण्याचा प्रयत्नं करण्यात आला असून त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेने भाजप-शिवसेनेच्या सरकारला सुद्धा एक अप्रत्यक्ष चपराक देण्याचा प्रयत्नं केला आहे.

१४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन असल्याने मनसेकडून मुंबईतल्या तब्बल ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ४ रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना पेट्रोलच्या भडकलेल्या किंमतीतून एका दिवसाचा का होईना पण दिलासा मिळणार आहे.

मनसेकडून मुंबईमध्ये ते मोठ्या प्रमाणावर केलं जाणार असलं तरी राज्यभरात अनेक ठिकाणी मनसेकडून राज्यातील ठिकाणी हा एका दिवसाचा अनोखा उपक्रम राबविला जात असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर भाखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर तब्बल ९ रुपये स्वस्त दराने दुचाकीस्वारांना पेट्रोलवाटप करण्यात येणार आहे. भायखळा विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून, त्याविरोधात मनसेने आंदोलन सुद्धा छेडलं होत.

मनसेने अप्रत्यक्षरित्या भाजप आणि शिवसेना सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती घटविण्यास सक्षम नसून, त्यांच्याच कार्यकाळात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच असल्याचा संदेश देण्याचा काम या अनोख्या उपक्रमातून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x