2 May 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर

मुंबई : ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यां विरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कारण छगन भुजबळ जामिनावर बाहेर येताच ओबीसी समाजाचे राजकारण आता तापू लागलं आहे. त्यात भाजप शिवसेनेच्या राज्यात ओबीसी समाजावर अन्याय झाल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. त्यात भाजपचे एकनाथ खडसेंसारखे जेष्ठ नेते सुद्धा भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप करत भाजपच्या अडचणीत वाढ करत आहेत. इतकंच नाही तर खडसेंनी ओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळांच्या मदतीला उभं राहण्याची घोषणा सुद्धा केली आहे.

त्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थितांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी विधान केलं होतं की, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणूनच तर मी शिवसेना सोडली आणि त्यातूनच शिवसेनेचा ओबीसींच्या आरक्षणाला विरोध होता असा संदेश गेला. त्यामुळे आगामी निवडणुकी जर भाजप आणि शिवसेनेला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकांनी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा तापविल्यास ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबोसी समाज निवडणुकीचे निकाल बदलू शकतो.

त्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या संदर्भात सामना मुखपत्रातून मराठा समाजाची खिल्ली उडविणारं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याने त्या मुद्याने सुद्धा आगामी निवडणुकीच्या तोंडावर जोर पकडल्यास शिवसेनेसाठी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोन्ही मुद्दे डोकेदुखी ठरतील हे वास्तव आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x