2 May 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

स्वाभिमानीचे आमदार लवकरच राष्ट्रवादीत? | थेट राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थिती

Swabhimani Shetkari party, MLA Devendra Bhuyar, Join NCP, Minister Jayant Patil

अमरावती, ०५ फेब्रुवारी: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहे. राष्ट्रवादीत दररोज इन्कमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार  सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Swabhimani Shetkari party MLA Devendra Bhuyar may join NCP party soon)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. काल अमरावती येथे यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हा परिवार संवाद कार्यक्रम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातून पत्रकारांना व इतर कार्यकर्त्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.

परंतु, कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णवेळ हजेरी लावली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करत थेट सभेच्या व्यासपीठावर जाऊन बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.भुयार यांनी भविष्यातील राजकीय संकेत तर दिले नाहीत ना? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

 

News English Summary: Since the formation of the Mahavikas Aghadi government in the state, the days of harvest have come for the NCP. The NCP seems to be getting incoming every day. Many MLAs and leaders in the BJP are in touch with the NCP. On the other hand, Swabhimani Shetkari Sanghatana MLA Morshi constituency MLA Devendra Bhuyar is also on the path of NCP.

News English Title: Swabhimani Shetkari party MLA Devendra Bhuyar may join NCP party soon news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x