5 May 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

थेट नाव घेण्याची गरज नाही | एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते - जयंत पाटील

Minister Jayant Patil, Pooja Chavan, suicide case, Minister Sanjay Rathod

मुंबई, १३ फेब्रुवारी: बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांचं या प्रकरणात थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती मला काहीच माहिती नाही मी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत आहे. मंत्रीमहोदयांचं थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागच्या काळातील घटना पाहिल्या की लक्षात येईल एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळे थोडंसं संयमाने घेण्याची गरज आहे. पोलिस याबाबतचा सविस्तर तपास करतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

 

News English Summary: NCP’s state president and water resources minister Jayant Patil has also given his reaction on this issue. I don’t think Sanjay Rathore needs to be named directly in this case. If we look back, we will notice that there is an immediate system to defame a person, said NCP state president Jayant Patil.

News English Title: Minister Jayant Patil made statement over Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x