15 October 2019 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

भिडेगुरूजी व शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास पोलिसांकडून बंदी

Sambhaji Bhide

पुणे : संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पालखी सोहळ्यात कुणी देखील घुसू नये आणि शिस्तीचं पालन व्हावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास यावेळी परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी स्पष्ट नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहवा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुन्हा एकदा मांडलं. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे देखील स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमतील आणि सर्व पालख्या पुढं गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील. पोलिसांना नियम सर्वांनाच सारखे केले असून त्यात संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठान असा कोणताही दुजाभाव केलेला नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(311)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या