18 May 2021 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'
x

जितकं काम तितकाच पगार असावा; असा एखादा निर्णय होणे गरजेचे: अमोल मिटकरी

NCP Leader Amol Mitkari, 5 working days

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ”सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला तर त्यांना सात दिवसांचा पगार तरी का द्यायचा. सातवा वेतन आयोग आहेच. खरंतर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल. पण जे २ दिवसही काम न कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा का करायचा. काही कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरून फाईल महिना महिना पुढे सरकत नाही, अशा कामच न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ का द्यायचे?” असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे.

मात्र आत याच विषयावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील यावर काहीस बच्चू कडूंच्या यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केलं आहे. सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. “जितकं काम तितकाच पगार असावा. सरकारी कामकाज करणाऱ्यांमध्ये पोलीस पण येतात, त्यांचा व शेतकऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल असा एखादा निर्णय होणे गरजेचे. तसेच कामकाज पाच दिवस तर पगार पण पाचचं दिवसाचाचं दिला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तर हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

विशेष म्हणजे केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला ६ दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितलं जातं.

 

Web Title: Much Salary work demand NCP Leader Amol Mitkari.

हॅशटॅग्स

#NCP(352)#UddhavThackeray(378)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x