पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये शिवसेनेच्या मागील वर्षीच्या जाहीरनाम्याची आणि घोषणांची आठवण मतदाराला करून देत आहेत. तत्पूर्वी मनसेने केलेल्या अनेक आंदोलनांचे दाखले आणि त्यातून निष्पन्नं झालेले सकारात्मक परिणाम देखील ते सभांमधून मांडताना दिसत आहेत.
दरम्यान, मनसेच्या आंदोलनामुळेच राज्यातील ६५ पेक्षा अधिक टोलनाके बंद झाल्याची आठवण राज ठाकरे यांनी सभांमध्ये करून दिली आहे. तसेच मनसेने आज पर्यंत कोणताही आंदोलन अर्थवट सोडलं नसून, सर्वच आंदोलनात सकारात्मक परिणाम दिले आहेत. मात्र तेच पुढे कायम ठेवण्यात सरकारला अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे त्यांनी २०१४ मधील उद्धव ठाकरे यांच्या टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेची आठवण मतदाराला करून दिली आहे. त्यानंतर सत्ता येऊन देखील सामान्यांवर टोळधाड सुरूच असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१४ मधील निवडणुकीत जाहीर घोषणा आणि जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्टरची घोषणा करून देखील मतदाराच्या तोंडाला पानं पुसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टोलमुक्त घोषणेबद्दल जी आठवण करून दिली तो सत्य असल्याचं हा पुरावा सांगतो.
#VIDEO: काय म्हटलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी टोलमुक्त महाराष्ट्र बद्दल?
