21 November 2019 7:16 AM
अँप डाउनलोड

आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों'

Aaditya Thackeray, Sachin Ahir, Yuva Sena, Shivsena

मुंबई: अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे ट्रोल झालेले शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा नेटकऱ्यांना खाद्य दिले आहे. दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी ‘हटाव लूंगी बजाव पुंगी’ची आठवण करुन दिली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर या परिसरात गुजरातीसह अनेक अमराठी भाषेतील होर्डिंग लावण्यात आले. त्यात ‘केम छो वरळी’ या गुजराती भाषेतील होर्डिंगवर तर प्रचंड टिका झाली होती. या टिके मुळे होर्डिंग हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सोमवारी वरळीतील प्रचारात आदित्य ठाकरे यांनी लुंगी आणि पांढरा शर्ट असा दाक्षिणात्य पेहराव परीधान केला होता. त्यावरुनही समाजमाध्यमांवर आदित्य यांना पुन्हा ट्रोल केले जात आहे.

एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी’ असा नारा दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मात्र, याला बगल देत आता दाक्षिणात्यांचीही मते शिवसेनेला गरजेची वाटू लागली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांची मते मागताना दिसत आहेत.

याशिवाय, आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळी मतदारसंघात लागलेल्या ‘केम छो वरली’ अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची समाज ,माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली होती. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आले होते.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(78)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या