4 May 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या | वीज पुरवठा खंडीत केल्याने स्वाभिमानीचं अनोखं आंदोलन

Swabhimani Shetkari protests, Cut off power supply, Agricultural pumps

हिंगोली, १३ फेब्रुवारी: हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हयात कृषीपंपाची सुमारे ३०० कोटींच्या वर देयकांची वसुली आहे. वीज कंपनीच्या वतीने मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या देयकाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये कृषीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफार्मरच बंद केले जात आहे.त्यामुळे एकाच वेळी तीन ते चार गावातील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत होत आहे.

त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा व परिसरातील कृषीपंपांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्यामुळे आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्या नैत्रुत्वात आंदोलन करण्यात आलं होतं.

 

News English Summary: Officials of Swabhimani Shetkari Sanghatana (SFS) on Saturday hung a plaque of ‘Energy Minister give water to drink’ around the necks of cattle at Taktoda in Hingoli district. 13 made unique movements. The decision to cut off power supply to the agricultural pump has been protested.

News English Title: Swabhimani Shetkari protests against the decision to cut off power supply to agricultural pumps in Hingoli news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x