4 May 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

फडणवीसांवर मोदी आणि अमित शहांनी दिली अजून एक जबाबदारी...

BJP leader Devendra Fadnavis, West Bengal Tour, Assembly election 2021

मुंबई, २२ फेब्रुवारी: पश्चिम बंगालमध्ये सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा मोठी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारनंतर आता फडणवीस प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस राज्यात समोरासमोर आले असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या असे २ दिवस भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.

बजबज आणि महेशताला अशा २ मतदारसंघांमध्ये सभा आणि यात्रा होणार आहेत. फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी यापूर्वी सोपवण्यात आली होती. एखाद्या राज्यात निवडणुक असल्यास इतर राज्यातील पक्षाच्या नेत्यांना त्या राज्यात प्रचाराला पाठवण्याची भारतीय जनता पक्षामध्ये पद्धत आहे. राज्यातील पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्यावर पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली २०११ आणि २०१६ साली तृणमूल काँग्रेसने सलग दोन वेळा सत्ता मिळवत राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. सलग ३४ वर्षं सत्ता असलेल्या डाव्या पक्षांना हटवून तृणमूलने इतिहास निर्माण केला होता.

 

News English Summary: West Bengal is currently in the throes of a political upheaval. After achieving great success in Bihar, Devendra Fadnavis has once again been given a big responsibility. After Bihar, Fadnavis has now moved to West Bengal for campaigning. While BJP and Trinamool Congress have come face to face in the state, BJP leader Devendra Fadnavis is on a two-day tour of West Bengal today and tomorrow.

News English Title: BJP leader Devendra Fadnavis is on a two-day tour of West Bengal before assembly election news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x