29 April 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस

NCP, Sharad Pawar, JJ Hospital, corona vaccine

मुंबई, ०१ मार्च: महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे. (NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital Mumbai for corona vaccine)

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांसोबत त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील होत्या. लसीकरणादरम्यान जे.जे. हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाणेदेखील पवारांसोबत उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवारांनी भारत बायोटेकची Covaxin दिली आहे. (During vaccination, J.J. The dean of the hospital Tatyarao Lahane was also present with Sharad Pawar)

आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्समध्ये लस घेतली. दरम्यान, शरद पवार राज्यातील पहिले कोरोना लस घेणारे नेते बनले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

 

News English Summary: The second phase of corona vaccination across the country, including Maharashtra, has started from Monday. This includes sick people over the age of 60 and those over the age of 45. Meanwhile, NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital in Mumbai and got corona vaccine.

News English Title: NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital Mumbai for corona vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x