28 May 2022 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल
x

बैठक झालेल्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; गुजरातचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन

CM Vijay Rupani, Gujarat, Corona Crisis, Covid19

गांधीनगर, १५ एप्रिल: मंगळवारी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.

विजय रुपाणी यांनी आज सकाळी डॉ. आर. के. पटेल आणि डॉ. अतुल पटेल यांच्याकडून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. त्यांची तब्येत ठिक आहे. मात्र, सध्या ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि टेलिफोन कॉलच्या माध्यमातून काम करत आहेत. तसेच, पुढील आठवड्यापर्यंत कोणालाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटण्यास परवानगी देण्यात आली नाही, असे, मुख्यमंत्र्यांचे सविच अश्विनी कुमार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत नियमांचं योग्य पालन करण्यात आल्याचं दिसत आहे. सर्वांनी मास्क घातले होते तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसले होते. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत इतर काही मंत्रीही उपस्थित होते. गुजरातमध्ये आतापर्यंत करोनाचे ६१७ रुग्ण सापडले असून ५५ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: On Tuesday, Congress MLA Imran Khedwala’s Gujarat Corona test-positive caused a stir in Gujarat. Also, Imran Khedwala had a meeting with Chief Minister Vijay Rupani and Deputy Chief Minister Nitin Patel. Therefore, Vijay Rupani was tried for Corona.

News English Title: Story corona virus Gujarat Chief Minister Vijay Rupani isolates himself after meeting Covid 19 positive congress MLA News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x