7 May 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान?
x

सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत भाजप, मनसे व शिवसेना असे सर्वच गट भरडले जाणार

जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने महापालिकेतील सर्वच म्हणजे ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भाजपमध्ये सर्व सूत्र गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्यात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या गटामुळे दुही माजण्याची चिन्ह आहेत.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडी सोबत युतीसाठी आग्रह असल्याने एकनाथ खडसे यांचा गट नाराज असल्याचे समजते. सुरेश जैन यांच्या खांदेश विकास आघाडी विरोधात या आधी लढणाऱ्या भाजपवर आता त्यांच्याच सोबत घेऊन जाण्यास गिरीश महाजन याचा गट इच्छुक असल्याने भाजपमध्ये सुद्धा फूट पडण्याची चिन्हं आहेत.

सुरेश जैन यांची खान्देश विकास आघाडी त्याच्या सोयीनुसार जिल्ह्यातील राजकारण करत असल्याने शिवसेनेचे महापालिकेत जेमतेम २ नगरसेवक आहेत, त्यांचे आणि पर्यायाने शिवसेनेचे अस्तित्व सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने कधीच संपुष्टात आणलं आहे. त्यामुळे खान्देश विकास आघाडीने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक शिवसेना सुद्धा संभ्रमावस्थेत आहेत.

जळगाव महापालिकेची निवडणूक ही भूतकाळात केवळ सुरेश जैन आणि एकनाथ खडसे अशीच होत आली होती. परंतु स्थानिक भाजपमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वादातून दोन गट पडले आहेत. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याने एकनाथ खडसे गटावर अन्याय होणार अशी भावना निर्माण झाली आहे. त्यात गिरीश महाजन हे सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडी सोबत युती करण्यास उत्सुक असल्याने भाजपमध्ये दोन गट पडून त्याचा फायदा खान्देश विकास आघाडीला होणार अशा शक्यतेने शिवसेना, मनसे आणि भाजप या सर्वच पक्षांचे विद्यमान नगरसेवक हळूहळू सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत सामील होतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या खान्देश विकास आघाडीचे ३२ नगरसेवक असून भाजप १५, मनसे ११, राष्ट्रवादी ११, शिवसेना २, जनक्रांती २, महानगर विकास आघाडी १ आणि अपक्ष १ असं पक्षीय संख्याबळ आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x