2 May 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

औरंगाबाद लॉकडाउन | परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन मिळेना | मदतीला पोलिस दादा धावला

Policemen help, girl candidate, Exam Center, lockdown

मुंबई, १३ मार्च: औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आज कॅनॉट, अविष्कार चौक, बळीराम पाटील शाळा, टिव्ही सेंटर अशा विविध भागात बंद पाळण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Policemen help girl candidate to reach exam Center during strict lockdown in Aurangabad)

दुसरीकडे शनिवारी झालेल्या रेल्वे बोर्ड भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्र गाठणे विद्यार्थ्यांसाठी खूप कठिण झालं. ना रिक्षा, ना टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि असली की वारेमाप भाडे आकारणी असा प्रकार पाहायला मिळत आहे. अशात मीनाक्षी नावाच्या एका तरुणीला वेळेवर धावून आलेला वर्दीतला देव माणूस अनुभवायला मिळाला. लोकडाऊन असल्याने परीक्षा केंद्र कसे गाठणार असा प्रश्न तिला पडला होता. सोबतच, प्रचंड पोलिस बंदोबस्त पाहून ती अतिशय घाबरली होती. त्यात पोलिस शिपाई हनुमंत चाळनेवाड दादांनी आपल्याला मदत केल्याचे तिने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकडाऊनमध्ये नियोजित असलेल्या परीक्षांना सवलत देण्यात आली आहे. शनिवारी रेल्वे भर्ती बोर्डच्या वतीने विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी बुलडाणा, शेगाव, जालना, हिंगोली, परभणी येथून विद्यार्थी आले होते. 2019 मध्ये अर्ज प्रक्रिया झालेल्या या परीक्षा दोन वर्षानंतर होत असल्याने कुणी खासगी वाहनाने तर कुणी एसटी बसने औरंगाबादेत परीक्षेसाठी आले. एकतर दोन वर्षानंतर परीक्षा होते आहे. त्यात गाड्या देखील मिळेना झाल्या होत्या.त्याचवेळी मूळची बुलढाण्याचे असलेल्या मीनाक्षीला परीक्षा केंद्राकडे पोलीस दादाच सोडून आले आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

 

News English Summary: The number of corona patients in Aurangabad city is increasing day by day. A partial lockdown has been imposed in Aurangabad city from March 11. The city’s transport system has been hit hard.

News English Title: Policemen help girl candidate to reach exam Center during strict lockdown in Aurangabad news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x