29 April 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार

Mumbai municipal corporation, Mumbai, vaccination camps

मुंबई, २५ मार्च: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवली जात आहे. तर महाराष्ट्रात दर दिवशी सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून येत असल्याचे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, अशातच आता मुंबई महापालिकेकडून रहिवाशी इमारतीमध्ये लसीकरण मोहिम राबवण्याचा विचार केला जात आहे. परंतु यासाठी केंद्राकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा केली जात आहे.

मुंबईत सध्या 60 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर महापालिकेच्या 24 लसीकरण केंद्रासह आठ खासगी रुग्णालयात दिवसाला जवळजवळ 41,000 जणांना लस दिली जात आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बुधवारी असे म्हटले आहे की, महापालिकेकडून रहिवाशी इमारतींमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यावर विचार केला जात आहे.

या संदर्भातील परवानगीसाठी पत्र सुद्धा केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे. जर केंद्राकडून यासाठी परवानगी दिली गेल्यास मुंबई महापालिका खासगी रुग्णालयांना सुद्धा रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्यासाठी परवानगी देऊ शकते. तत्पूर्वी खासगी रुग्णालयात पुरेश्या वैद्यकिय सोईसुविधा आहेत की नाही ते पाहिले जाणार आहे. संपूर्ण दृष्टीकोनातून याचा विचार केला जाईल असे ही काकाणी यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: A vaccination campaign is currently underway to fight the corona virus. The Union Ministry of Health has recently clarified that Maharashtra has the highest number of patients per day. Similarly, the Mumbai Municipal Corporation is now planning to launch a vaccination campaign in residential buildings. But it is awaiting permission from the Center.

News English Title: Mumbai municipal corporation is planning to vaccination camps in housing societies news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x