मुंबई, २९ मार्च: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार काल तपासणीसाठी गेले होते. त्यांना पोटात दुखत असल्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर त्यांना पित्त मूत्राशयामध्ये त्रास असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर 31 मार्च रोजी छोटी शस्त्रक्रिया आणि एऩ्डोस्कोपी करण्यात येणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द असणार आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान, पवार हे गेल्या आठवड्यात संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी दिल्लीत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. त्यामुळे पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन देशमुखांचा बचावही केला होता. दरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

 

News English Summary: Sharad Pawar had gone to Breach Candy Hospital in Mumbai for check-up yesterday. He was suffering from stomach ache. He was diagnosed with gall bladder problems. He will undergo minor surgery and endoscopy on March 31. All their events will be cancelled until further notice. Such information has been given by Nawab Malik.

News English Title: NCP President Sharad Pawar admitted in Breach Candy Hospital said minister Nawab Malik news updates.

Breaking | शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल