5 May 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

गुजरात | इशरत जहां एनकाउंटर | क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

A CBI court, Ishrat Jahan encounter, Amit Shah, Narendra Modi

गांधीनगर, ३१ मार्च: गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी CBI कोर्टाने क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने म्हटले की, इशरत जहां, लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी असल्याच्या गुप्त रिपोर्टला नाकारता येत नाही. यामुळेच या तीन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

2004 नंतर गुजरात सरकारने IPS जीएल सिंघल, रिटायर्ड DSP तरुण बारोट आणि असिस्टेंट सब-इंस्पेक्टर अंजू चौधरी यांच्या विरोधात इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता. बुधवारी या प्रकरणी दाखल अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणी कोर्टाने म्हटले की, इशरत जहां दहशतवादी असल्याचे पुरावे आहेत. त्या तीन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले.

15 जून, 2004 ला अहमदाबादमधील कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ पोलिस एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते. गुप्त माहितीनुसार, हे सर्वजण लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आले होते. या एनकाउंटरनंतर इशरत जहांची आई समीमा कौसर आणि जावेदचे वडील गोपीनाथ पिल्लईने हायकोर्टात अर्ज दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली होती. या प्रकरणी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती.

 

News English Summary: A CBI court has acquitted three crime branch officers Girish Singhal, Tarun Barot and Anju Chaudhary in the much-discussed Ishrat Jahan encounter case in Gujarat. The court said that Ishrat Jahan’s secret report that Lashkar-e-Taiba was a terrorist could not be denied. That is why these three officers have been released.

News English Title: A CBI court has acquitted three crime branch officers in Ishrat Jahan encounter case of Gujarat news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x