1 May 2024 6:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

राज्यात कडक निर्बंध लागू | पण काय आहेत कडक निर्बंध? - सविस्तर

Maharashtra, Corona Pandemic

मुंबई, ०४ एप्रिल: मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

काय आहेत नेमके कडक निर्बंध;

  • शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
  • लोकल ट्रेन सुरू राहणार
  • जिम बंद होणार
  • अत्यावश्यक सेवांना परवनगी
  • रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
  • अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
  • रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
  • धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
  • सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
  • गार्डन, मैदाने बंद
  • जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
  • सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
  • रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
  • बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
  • टॅक्सीत मास्क घालावा
  • कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
  • मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
  • चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
  • बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
  • शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
  • प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
  • सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
  • 20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
  • लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
  • विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार

 

News English Summary: In the last few days, the state government has been woken up by the fact that Corona pandemic increasing highly. The rapid increase in the number of patients has put a strain on the health service, and the state government is conducting a lockdown to prevent the spread of the virus. After discussions with representatives from all walks of life and leaders of the opposition, the Cabinet today sealed the decision to impose lockdown / strict restrictions.

News English Title: Maharashtra lockdown strict corona guidelines CM Uddhav Thackeray check details news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x