29 April 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम

Supreme Court

नवी दिल्ली, १२ एप्रिल: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे देशात करोनाचा कहर वाढत असून सुप्रीम कोर्टालाही याचा मोठा फटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी करोनाबाधित असल्याने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात येत आहे. अनेक खडंपीठ एक तास उशीरा सुनावणी घेणार आहेत.

एका न्यायाधीशाने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, माझे अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. काही न्यायाधीशांनाही करोनाची लागण झाली होती. पण त्यातून ते लवकर बरे झाले आहेत.

 

News English Summary: About 50 per cent of Supreme Court employees are infected with coronavirus. According to ANI, the Supreme Court judges will conduct the hearing through video conferencing from home as the staff is tax-exempt. The entire premises of the Supreme Court is being sanitized. Several benches are scheduled to hold hearings an hour late. According to information given to NDTV by a judge, many of my employees have become coronary. Some of the judges were also infected with corona. But they have recovered quickly.

News English Title: About 50 per cent of Supreme Court employees are infected with coronavirus news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x