भाजपचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी फडणवीस तसे भाषण करत असतील - संजय राऊत

मुंबई, १२ एप्रिल: देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही चालू आहे…म्हणजेच लॉकडाऊन’, हे लॉक करायचे, ते अनलॉक करायचे असेच सुरू आहे. देशभरातून सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन करण्यात येत आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यानंतर फडणवीस यांनी पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये प्रचारसभेत बोलताना सूचक विधान केलं आहे. “लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे? याने काय सरकार बदलणार आहे का? मी म्हणतो सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीसांच्या विधानावर संजय राऊत यांनी देखील प्रतिउत्तर दिलं आहे. एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याला राऊत यांनी प्रत्युत्तर देताना, सरकार पाडल्यानंतर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असे म्हटलंय.
सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
News English Summary: Sanjay Raut has also responded to Fadnavis’ statement. We have made such speeches before, Devendra Fadnavis may be giving such speeches to bring enthusiasm among the people, to keep their MLAs together, said Sanjay Raut.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut reply to Devendra Fadnavis after his statement at Pandharpur Mangalvedha news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL