29 March 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

आदित्य ठाकरेंकडे 'जन आशीर्वाद' यात्रेसाठी वेळ; पण तिवरे धरणातील बाधितांना भेटण्यास वेळ नाही?

Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena, Yuvasena, Tiware Dam Incident

मुंबई: चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र सत्तेत विराजमान असून आणि स्वतःला कोकणचे कैवारी समजणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे फिरकलेच नाहीत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.

दरम्यान फडणवीसांची ‘विकास यात्रा’ १ ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी तसेच ५ वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच घाईघाईत आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं मतदान झाल्याने मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं शिवसेनेकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार असल्याचे समजते. सध्या शिवसेना, भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु तरी देखील शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४चा अनुभव गाठीशी असल्याने आणि भाजपावर पूर्ण विश्वास नसल्याने भाजप थेट निवडणुकीच्या वेळी युती तोडूदेखील शकतो हे माहित असल्याने शिवसेना हा धोका टाळण्यासाठी कामाला लागली आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर ‘आशीर्वाद यात्रा’ काढायला वेळ आहे, मात्र अनेक निरपराधांचे बळी जाऊन देखील उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे येथे फिरकले देखील नाहीत आणि त्यामुळे समाज माध्यमांवर आत्तापासूनच त्यांच्या या यात्रेवर टीका करण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x