2 May 2024 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे

Raj Thackeray

नाशिक, २१ एप्रिल: नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरायचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 22 जणांना जीव गमावावा लागला. दरम्यान या घटनेवरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करताना या घटनेस जवाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

नाशिकच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: MNS president Raj Thackeray has reacted after the Nashik tragedy. Innocent patients lost their lives in a hospital in Nashik due to oxygen leakage. This incident is very painful. Maharashtra Navnirman Sena pays homage to the deceased. There is a huge strain on the health system but if anyone is careless, they should be severely punished by the government, said Raj Thackeray.

News English Title: MNS president Raj Thackeray has reacted after the Nashik oxygen leaked tragedy news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x