27 July 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

गणेशविसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

DCM Ajit Pawar

पुणे, १७ सप्टेंबर | राज्यात कोरोनाचे सावट असून यंदादेखील होत असलेल्या गणेश उत्सवासाठी पोलिसांकडे नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व च्या सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गणेशविसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार – All shop will closed on Ganesh -Visarsan day in Pune Pimpri Chichwad says DCM Ajit Pawar :

जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. विधानभवन येथे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यपाल तर महामहिम त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सहकार रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकलपटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क माणूस स्वतःच्या हाताने काढला. यावर अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणे उचित नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. ते आम्हाला शपथ देतात. तो त्यांचा अधिकार असतो त्यांच्या अधिकारावर बोलणे योग्य नाही, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: All shop will closed on Ganesh Visarsan day in Pune Pimpri Chichwad says DCM Ajit Pawar.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x