महाराष्ट्र कडक निर्बंध | दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास? - स्टेप बाय स्टेप

मुंबई, २३ एप्रिल: राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.#EPassForTravel
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
कसा काढाल ई पास आणि कसा कराल डाउनलोड?
- आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. संदर्भासाठी फोटो पाहा.
- या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या टॅबवर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही पर्याय निवडा.
मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या निवडावी लागणार आहे.
- पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.
- या फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.
- वरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit टॅबवर क्लिक केल्यास तुमचा ई पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याचा एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल.
- आपला अर्ज मंजू झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.
महत्वाची टीप:
- ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असं देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.
- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
News English Summary: The state government has announced strict restrictions against the backdrop of the worsening situation of corona in the state. This includes restrictions on inter-district, inter-district and inter-state travel. Travel is permitted only for reasons such as emergency services, medical treatment or unavoidable, and a pass is required for such travel. For this, the police department has provided a link to the website and from that link, the concerned has appealed to the concerned to apply for the pass.
News English Title: Maharashtra lockdown how to apply for online E pass Link for Inter District Travel news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL