5 May 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्रावर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की.... काय म्हणाले फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई, २६ एप्रिल: एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मुंबईतील नवीन रुग्णांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. दुसरी चांगली बातमी ही की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

राज्यात आतापर्यंत 42 लाख 95 हजार 027 लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले असून यातील 35 लाख 30 हजार 060 लोक बरे झाले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 64 हजार 760 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 6 लाख 98 हजार 354 सक्र‍िय रुग्ण आहे. सक्र‍िय रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे अमेरिका, ब्राझील, आणि फ्रान्स देशांचा समावेश होतो.

दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. ‘केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे. जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. आज देखील वायुदलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये,” अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has indirectly criticized Shiv Sena MP Sanjay Raut without mentioning him. He was talking to the media in Mumbai. Leader of Opposition Devendra Fadnavis informed about the assistance given to the state by the Center.

News English Title: Devendra Fadnavis criticized MP Sanjay Raut indirectly over aid getting from union govt to Maharashtra govt news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x