7 May 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, त्या यादीत महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश - सचिन सावंत

Sachin Sawant

मुंबई, २६ एप्रिल: केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यासंदर्भात एक यादी ट्विट करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.

यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे दावे खोडून काढताना टीका केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीसजी आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.

पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, “एमव्हीए सरकारने 15 ते 30 एप्रिल या 15 दिवसांत 25000 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. 17500 मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला 7500 मे.टन म्हणजे 500 मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु 345 मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे…कृपया खोटे बोलणे थांबवा.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant has criticized Devendra Fadnavis for refuting his claims. In it, he has said, “Devendra Fadnavisji, the list you are giving credit to Modiji includes projects in Maharashtra. Maharashtra has a generating capacity of 1250 MT. It does not need Modi’s permission. It is not appropriate to thank him for that.” The Modi government is cunning.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant slams Devendra Fadnavis over sharing number on Oxygen supply from Union govt news updates.

 

 

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x