6 May 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या
x

मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ

पंढरपूर : थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.

क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये तब्बल १६ देश सहभागी होत असून त्यामध्ये आयात कर शून्य ते पाच टक्के करून घेण्यावर अनेक देश आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केलं. त्यामुळे न्यूझीलंड सारख्या देशातून स्वस्त दरात येणाऱ्या दूध पावडरमुळे बनविले जाणारे दूध देशात केवळ सात ते दहा रुपयांपर्यंत मिळू शकेल. तसेच खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने आणि इतर सर्व देशातून येणाऱ्या खाद्य तेलामुळे भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप अडचणीत येणार असल्याचा दावा के. व्ही. बिजू यांनी केला आहे.

आधीच देशातील ७५ हजार लिटर टन दूध हे २०,००० टॅन दूध पावडर व १५,००० टन बटर ऑइल मिसळून आले आहे आणि त्यामुळे दूध व्यावसायिक अडचणीत आला आहे. त्यात जर विद्यमान ४० टक्के आयात कर सुद्धा कमी केल्यास दूध हे फक्त सात ते दहा रुपयांना प्रति लिटर उपलब्ध होईल असं राष्ट्रीय किसान महासंघाच म्हणणं आहे.

विशेष म्हणजे मोदी सरकारवर आयात दर कमी करण्यासाठी प्रचंड दबाव असला तरी या विषयावर सरकारची नेमकी भूमिका समजू शकलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील वाढत्या दबावामुळे या कराराला स्थगिती दिली होती.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x