12 May 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा
x

उद्या भाजप सरकार गेल्यावर, त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? राज ठाकरे

पुणे : मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून त्यामुळे अनेक प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यां आक्रमक पवित्रा घेत झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं आहे.

गेल्या आठवडाभर मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील खड्ड्यांचा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. त्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करत थेट मंत्रालयाच्या प्रवेश द्वारावर खोदून टाकले आणि सरकारला खड्ड्यांच्या त्रासच गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्नं केला. परंतु त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेऊन काहींना थर्ड डिग्री देण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच त्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा त्यांनी सांगितलं. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा खटले दाखल केले जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.

परंतु याच विषयाला धरून राज ठाकरे यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध करत प्रति प्रश्न उपस्थित केला की,’उद्या भाजप सरकार गेल्यावर ते विरोधी पक्षात बसले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? तसेच दूध आंदोलनावरही त्यांनी भाष्य करत थेट विधान केलं की राज्य सरकार हे केंद्र सरकार चालवतंय व त्यामुळे अमूलसारख्या गुजरातमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात मोकळं रान मिळावं, म्हणून सरकारचा हा सर्व घाट असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x