3 May 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

गुजरातसाहित अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम लांबणीवर | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Congress leader P Chidambaram

मुंबई, ३० एप्रिल | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे तीन दिवस कोरोना लसीकरण केले जाऊ शकणार नाही. येथे 2 मेपर्यंत लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. BMC ने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, ‘लसीच्या कमतरतेमुळे पुढच्या तीन दिवसांपर्यंत मुंबईमध्ये व्हॅक्सीनेशन करणार नाही.’ तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.

दुसरीकडे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १६.१६ कोटी डोस मोफत उपलब्ध करून दिले असल्याचे स्पष्ट करून तीन दिवसांत आणखी २० लाख डोस मोफत दिले जातील असा दावा केंद्र सरकारने केला.

अशी आहे विविध राज्यांतील स्थिती

गुजरात:
लस मिळत नाही तोपर्यंत मोहीम सुरू करणे कठीण आहे, लस मिळाल्यानंतर तारीख जाहीर करू, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगाल-गोवा:
लसीकरणासाठी १८ वर्षांवरील लोकांची नोंदणी सुरू आहे. पण राज्यात नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणाची तारीख दिली जात नाही. गोव्यातही असेच झाले आहे.

मध्य प्रदेश:
राज्याने ४५ आणि ६० वर्षांवरील लोकांचे लसीकरण दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मेपासून १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दिल्ली:
राज्य सरकारने १.३ कोटी डोस खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. डोस मिळणे बाकी आहे. एक मेपासून तिसरा टप्पा मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याची शक्यता नाही. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना तारीख मिळू शकली नाही.

उत्तर प्रदेश:
चार ते पाच कोटी डोससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. मोफत लस देण्याची घोषणा झाली आहे. पण पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे की नाही हे स्पष्ट नाही. सीरम व भारत बायोटेककडून ५०-५० लाख डोस खरेदीचा आदेश देण्यात आला आहे.

लसीबाबत अनिश्चितता:
बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड, छत्तीसगड, आंध्र, तेलंगणा, गोवा, राजस्थान, हिमाचलने लसीसाठी कंपन्यांशी करार केला आहे. पण लसीबाबत अनिश्चितता आहे.

काँग्रेसशासित राज्यांची तक्रार:
राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यांनी याआधीच लस उपलब्ध नसल्याची तक्रार केली आहे. झारखंडनेही हीच तक्रार केली आहे.

यादरम्यान काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना आव्हान दिलं आहे. चिदंबरम यांनी यावेळी कोणतंही राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर CoWin अॅपही सहकार्य करत नाही असंही ते म्हणाले आहेत. “जर लस नाही म्हणून १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?,” अशी विचारणा करत चिदंबरम यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.

 

News English Summary: Senior Congress leader P Chidambaram has challenged Union Health Minister Harsh Vardhan. Chidambaram claimed that no state was yet ready for vaccination in the age group of 18-44. Not only that, but the CoWin app doesn’t work either, he said. “If people are sent home from vaccination centers after May 1 because there is no vaccine, will the health minister resign?” Chidambaram has publicly challenged.

News English Title: Congress leader P Chidambaram demanded resignation of union health minister Harsh Wardhan over vaccine shortage news updates.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x