1 May 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
x

अविश्वास जिंकणार? की मोदींना विरोधकांमध्ये फूट पाडण्याची संधी? आजच निकाल

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने थेट केंद्रातील सत्तेतून आणि एनडीए’मधून सुद्धा बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आणि त्यांनी थेट मोदी सरकारविरुद्ध विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नं केला. त्यामुळे आज केंद्र सरकारला अविश्वास ठरावाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

विरोधकांनी मोदीसरकार विरुद्ध अविश्वास ठरावाला आणला असला तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अर्थात एनडीए’चा निर्णय विजय जवळजवळ निश्चित मनाला जात आहे. त्यामुळे या ठराव मोदी सरकारपेक्षा विरोधकांची एकी किती आहे हेच निश्चित करणारा ठरेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. या ठरावामुळे एनडीए आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीची ताकद पाहता येणार आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. भाजप सध्याच्या संख्याबळापेक्षा स्वतःची ताकद अजून वाढवून विरोधकांच्या एकीला धक्का देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे. सभागृहात भाजपचे संख्याबळ हे ३१२ इतके असून विरोधकांकडे ते १५३ च्या घरात आहे आणि त्यामुळे विरोधक या विजयापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव सुमारे २०० मतांच्या दणदणीत फरकाने फेटाळला जाऊ शकतो.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x