29 April 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

प. बंगाल विधानसभा निकाल | सकाळचा भाजप समर्थकांचा 200 पार ट्विटर ट्रेंड काही वेळातच मावळला

West Bengal assembly election 2021

कोलकत्ता, ०२ मे | कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे. कारण यावेळी ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काँग्रेसला लेफ्ट आणि काँग्रेसकडून नाही तर भाजपकडून थेट टक्कर मिळाली आहे. जास्तीत जास्त एग्जिट पोल्समध्ये हेच दाखवले आहे की, भाजप यावेळी ममतांना बरोबरीने टक्कर देणार आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये बंगालमध्ये तृणमूलला मोठे नुकसान होत असताना दिसत आहे. भाजप तृणमूलला कठोर टक्कर देत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी भाजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा पिछाडीवर आहेत. मात्र पहिल्या काही फेऱ्यांनंतर तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे.

पहिल्या पोस्टल मत मोजणीमध्ये एकेकाळचे ममता यांचे सहकारी सुवेंदू अधिकारी हे पुढे असून ममता या 1500 मतांनी पिछाडीवर होत्या. तर आतापर्यंत आलेल्या शेवटच्या अपडेट्स नुसार ममता बॅनर्जी या ७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. मात्र सध्या टीएमसीने २०० जागांच्या पार जाण्याएवढी मुसंडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे भाजप समर्थकांनी सकाळी #BJPKorbe200Paar ट्रेंड सुरु केला होता, जो काही वेळाने मावळताना दिसला.

पश्चिम बंगाल
एकूण जागा : 294 (मतदान 292 जागांवर झाले)
बहुमत : 148(292 जागांच्या हिशोबाने 147)
गेल्या वेळी कोण जिंकले : तृणमूल काँग्रेस

29 एप्रिलला झालेल्या एक्झिट पोलमध्ये बंगालबद्दल कोणतेही एक मत दिसले नाही. 9 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला बहुमत मिळत असल्याचे दिसते आहे किंवा बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर 3 पोलमध्ये भाजप पुढे आहे. मात्र, सर्व पोल्समध्ये तृणमूलला होणारे नुकसान स्पष्ट दिसत आहे.

 

News English Summary: The results of the elections in West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala and Puducherry will finally be announced today after a 62-day election process amid record cases of corona. Of the 5 states, Bengal has the most interest. Because this time Mamata Banerjee’s Trinamool Congress has got a direct blow from the BJP and not from the Left and Congress.

News English Title: West Bengal assembly election 2021 TMC may cross 200 seats in result news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x