29 April 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
x

ममता बॅनर्जीं यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

Mamata Banerjee sworn

कोलकत्ता, ५ मे | पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी(आज)सकाळी 10:50 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एक चकीत करणारी घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी यावेळी ममता बॅनर्जींना राज्यातील हिंसा बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना दिल्या.

यावर ममता म्हणाल्या की, आतापर्यंत राज्यातील व्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, आता मी आल्यानंतर नवीन व्यवस्था लागू करेल. यावेळी फक्त ममता यांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या कॅबिनेटमधील इतर मंत्री 6 किंवा 7 मे रोजी शपथ घेऊ शकतात.

ममता शपथविधीनंतर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता कोविडविरोधातील लढाईला जिंकण्याची आहे. राज्यातील हिंसेवर त्या म्हणाल्या की, राज्यातील जनतेला हिंसा आवडत नाही. हिंसाचार घडवणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. यापुढे हिंसेची घटना घडली नाही पाहिजे. राज्यपाल जगदीश धनखडदेखील म्हणाले- आशा करतो की, ममता बॅनर्जी संविधानाचे पालन करतील. राज्यात कायदा सुव्यवस्था लागू व्हावी.

 

News English Summary: After winning a landslide victory in West Bengal, Chief Minister Mamata Banerjee was sworn in as Chief Minister on Wednesday (today) at 10:50 am. This time a shocking incident happened. West Bengal Governor Jagdeep Dhanakhad this time instructed Mamata Banerjee to stop the violence in the state.

News English Title: Mamata Banerjee sworn in as Chief Minister of West Bengal news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x