11 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

Andhra Pradesh Politics | आंध्र प्रदेशातही काँग्रेस धमाका करणार, दिग्गज नेते स्व.राजशेखर रेड्डी यांच्या कन्या शर्मिला रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

YSR Telangana Party Sharmila Reddy

Andhra Pradesh Politics | कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील नेत्रदीपक विजयानंतर आता काँग्रेसची नजर दक्षिणेतील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवर आहे. दोन्ही राज्यांमध्ये गमावलेली जमीन परत मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पक्ष संघटना बळकट करून नव्या मोठ्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे.

तेलंगणापेक्षा आंध्र प्रदेश हे काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. आंध्र प्रदेशात पक्षाकडे स्थानिक चेहरा नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एक टक्का मते मिळाली होती, तर तेलंगणात 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 28 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे आंध्र प्रदेशात पक्ष नव्या नेत्यांच्या आणि चेहऱ्यांच्या शोधात होता.

त्यामुळे संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कुटुंबावर काँग्रेस पक्षाची नजर आहेत. आंध्र प्रदेशचे दिग्गज नेते स्व.राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि वायएसआरटीपी पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला रेड्डी यांनी नुकतीच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. शर्मिला सातत्याने काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. त्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा राजकीय धमाका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी आंध्र प्रदेशात जाण्याची शक्यता
दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी ८ जुलै रोजी कडप्पा येथे जाण्याची शक्यता आहे. राजशेखर रेड्डी यांच्या पत्नी विजयम्मा आणि मुलगी वाय. एस. शर्मिला यांनाही शोकसभेसाठी निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. यानंतर पक्ष शर्मिला यांच्याकडे आंध्र प्रदेश संघटनेची जबाबदारी सोपवू शकतो असं वृत्त आहे.

तेलंगणात शर्मिला यांचा पक्ष सक्रिय
वाय. एस. शर्मिला यांचा वायएसआरटीपी तेलंगणात सक्रीय असला तरी आंध्र प्रदेशशी त्यांचा खोल संबंध आहे. शर्मिला यांनी 2021 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले त्यांचे बंधू जगनमोहन रेड्डी यांच्यापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. भावंडांमधील भांडणानंतर आई विजयम्मा यांनीही वायएसआर काँग्रेसच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. अशा परिस्थितीत पक्ष स्वत:ला पर्याय म्हणून सादर करू शकतो. पण पक्षाकडे मोठा चेहरा नाही. वाय. एस. शर्मिला यांनी पक्षात प्रवेश केल्यास कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि संपूर्ण राज्यातील जनता शर्मिला यांना नेता म्हणून मान्यता देईल. पण वाय. एस. शर्मिला यांच्याबाबत पक्षाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी मंगळवारी तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राहुल गांधी 2 जुलै रोजी तेलंगणात आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. पक्ष मुख्यालयात झालेल्या या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांसह तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

News Title : YSR Telangana Party President Sharmila Reddy may join congress check details on 28 June 2023.

हॅशटॅग्स

Sharmila Reddy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x