3 May 2025 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी

India corona pandemic

वॉशिंग्टन, ११ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.

दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात पसरत असलेल्या स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सर्वात पहिले ऑक्टोबरमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट B.1.617 जास्त संक्रामक आहे आणि हा सहज पसरू शकतो.

कोरोनावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख मारिया वॅन केरखोवनुसार एका छोट्या सँपल साइजवर केलेल्या लॅब स्टडीमध्ये समोर आले की, या व्हेरिएंट (B.1.617) वर अँटीबॉडीजचा कमी परिणाम होत आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, या व्हेरिएंटमध्ये व्हॅक्सीनप्रती जास्त प्रतिरोधक क्षमता आहे.

केरखोवने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, उपलब्ध डेटाने समजते की, कोरोनाच्या सर्व व्हॅक्सीन आजार रोखणे आणि B.1.617 व्हेरिएंटने संक्रमित लोकांचा जीव वाचवण्यात प्रभावी आहे. यासोबतच म्हटले की, या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मंगळवारी दिली जाईल. WHO च्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनीही असे म्हटले आहे की सद्यस्थितीतील लस आणि तपासणी प्रभावी आहे. तसेच उपचारही पूर्वी सारखेच दिले जात आहेत. म्हणूनच लोकांना ते बदलण्याची गरज नाही, त्याऐवजी त्यांनी पुढे येऊन लसीकरण केले पाहिजे.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) has said that the second wave of corona in India is a global concern. He said that this variant B.1.617, first found in India in October, is highly contagious and can spread easily.

News English Title: The World Health Organization has said that the variant B 1 617 in second wave of corona in India is a global concern news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या