13 December 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आरोग्य खात्याकडून कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती - सविस्तर

New corona symptoms, Covid 19, India

नवी दिल्ली , १९ जुलै : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६ लाख ७७ हजार ४२३ जणांना कोरोनावर मात केलेली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे २६ हजार ८१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. देशात १८ जुलैपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ नमूण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील ३ लाख ५८ हजार १२७ नमूने काल तपासण्यात आले आहेत.

यापूर्वी कोरोनाची अनेक लक्षणं समोर आली आहेत. मात्र आता जुन्या लक्षणांबरोबरच अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, जुलाब, थंडी यांचाही समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील कामाचा ताण वाढत आहे. त्यातच दरवेळी कोरोना आपल्या लक्षणांमध्ये बदल करत असल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर हे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाच्या नव्या लक्षणांची यादी जाहीर केली आहे. सुका खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही कोरोनाची जुनी लक्षणे आहेत.

परंतु आता या लक्षणांबरोबरच कोरोनाची काही नवी लक्षणे डॉक्टरांना सापडत आहेत. ती म्हणजे अंग दुखणे, डोके दुखणे, अशक्तपणा, थंडी वाजणे, उलटी होणे, जुलाब आणि बडग्यातून रक्त पडणे ही नवी लक्षणे काही कोरोनाच्या रुग्णांमध्ये आढळत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 

News English Summary: Corona has a number of symptoms. But now along with the old symptoms, body aches, headaches, vomiting, diarrhea and cold are also included. Corona patients have been growing rapidly around the world over the past few days.

News English Title: New corona symptoms declared by Union Health Ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x