4 May 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ

India corona pandemic

लखनऊ, १२ मे | देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दुसरीकडे यूपी-बिहारसारखी काही राज्ये सर्वाधिक टेस्ट केल्याचा दावे करतात, लोकसंख्येचं प्रमाण बघता ही दोन्ही राज्ये टेस्टिंगच्या बाबतीत टॉप-२० मध्येही येत नाहीत. त्यात उत्तर प्रदेशमधील मेरठमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे. मेरठमधील करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ९४१ वर पोहचली आहे. त्यामुळेच येथील सर्वात मोठं सरकारी कोरोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

धक्कादायक म्हणजे परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत. या केंद्रामधील पंखे काम करत नाहीयत, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचं चित्र दिसत आहे.

या केंद्रात करोना नियमांचं पालन होतानाही दिसत नाही. रुग्णांच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक बसून असतात. रुग्णांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने नातेवाईकांना परवानगी देण्यात आल्याचं समजतं. या ठिकाणी मोकळी हवाही नाहीय. येथील एक ३४ वर्षीय रुग्ण चक्क एक्स रे रिपोर्टच्या सहाय्याने स्वत:ला हवा घालतानाही दिसला.

 

News English Summary: The situation in Uttar Pradesh is so dire that patients are coming here with their own folding beds. The fans in the center are not working, the roof is leaking in many places and the patient’s bed is even up to the toilet door.

News English Title: Uttar Pradesh district reporting highest cases families brining their own folding cots to ward news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x