26 July 2021 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार

home remedies for snoring

मुंबई १२ मे : रात्री झोपेत घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का, मग काळजी करू नका. कारण ही समस्या तुमच्या प्रमाणे अनेकांना सतावत असते. मात्र तुमच्या अशा घोरण्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अथवा तुमच्या जोडीदाराची झोपमोड होऊ शकते.असं म्हणतात की एखादा व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा तो गाढ झोपेत असतो. असं नाही हे विधान चुकीचे आहे. घोरणे हा एक प्रकारचा आजार आहे. व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा त्याच्या गळ्याचे स्नायू कमकुवत असतात. जबड्याचे स्नायू मध्ये ताण होतो आणि नाक अवरुद्ध होणे असे मुख्य कारणे आहेत. या साठी काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून या समस्यपासून सुटका मिळवू शकतो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

1 एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळा. दररोज झोपण्यापूर्वी हे प्यावे. असं केल्याने आपल्याला आराम मिळेल.

2 एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यानं घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

3 एक कप उकळत्या पाण्यात दहा पुदिन्याची पानें घालून उकळवून घ्या आणि थंड करा. गाळून प्यावे. असं केल्यानं घोरण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.

४. रात्री झोपताना नाकपुड्यांमध्ये शुद्ध तूपाचे काही थेंब सोडा. नियमित नाकपुड्यांमध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल.

5. जर तुम्हाला दूध पिणे आवडत नसेल कोमट पाण्यातून तुम्ही वेलची पावडर घेऊ शकता. हा उपाय रोज केल्यामुळे काही दिवसांनी तुमचा घोरण्याचा त्रास नक्कीच कमी होईल.

6. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात निलगिरीचे काही थेंब टाका आणि या पाण्याची वाफ घ्या. वाफ चेहऱ्यावर घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. श्वसनमार्ग मोकळा झाल्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्याही कमी होईल.

7. श्वसनमार्गात कफामुळे निर्माण झालेला अडथळा वाफ घेण्या मुळे कमी होतो. त्याचा चांगला परिणाम तुमच्या घशा आणि नाकाच्या कार्यावर होतो आणि तुमचे झोपेत घोरणे बंद होते.

8. झोपेत घोरणे बंद करण्यासाठी थोडे वजन कमी करा. यासाठी तुमच्या डाएटवर योग्य लक्ष द्या, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.

9. गाणं हा नाक,जीभ आणि घशाच्या स्नायूंना व्यायाम देणारा योग्य उपक्रम आहे. याचप्रमाणे तज्ञ्जांकडून जीभ आणि घशाचे इतर व्यायामदेखील शिकून घ्या आणि त्याचा सराव करा. घोरणे बंद करण्यासाठी उपाय केल्याने नक्कीच चांगला फायदा होईल.

झोपेत घोरणे बंद करण्यासाठी उपाय याबाबत प्रश्न

1. घोरणे आरोग्य बिघडल्याचे एक लक्षण आहे का ?
झोपेत घोरण्यामागची कारणे अनेक असू शकतात. जसं की, अपुरी झोप, अशक्तपणा, थकवा, घशाचे विकार, सर्दी, मधुमेह, अती वजन, उच्च रक्तदाब. त्यामुळे तुम्ही का घोरत आहात हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार योग्य ते उपचार करून तुम्ही घोरणे बंद करू शकता.

2. घोरणे बंद करण्यासाठी काय खावे ?
घोरणे बंद करण्यासाठी काय खावे यापेक्षा कधी काय खावे हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी रात्री फार उशीरा जेवू नका आणि घोरणे बंद करण्याचे घरगुती उपाय करा.

3. कोणता व्यायाम केल्याने घोरणे बंद होते ?
घोरणे बंद करण्यासाठी जीभ आणि घशाच्या स्नायूंना आराम मिळेल असे व्यायाम करावेत. गाणं हा जीभ आणि घशाच्या स्नायूंना आराम देणारा चांगला व्यायाम आहे.

News English Summary: If you have trouble falling asleep at night, then don’t worry. Because this problem is bothering many like you. Snoring is a kind of disease. A person snores only when his neck muscles are weak. The main causes are tension in the jaw muscles and nasal congestion. There are some home remedies that can be used to get rid of this problem.

News English Title: Do home remedies for snoring while sleeping news update article

हॅशटॅग्स

#Health(642)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x