26 November 2022 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 28 नोव्हेंबर - 4 डिसेंबर | 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशीबाची साथ कोणाला? Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
x

तर एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद उफाळेल | भाजप धोका उचलणार?

Bihar Assembly Election 2020, RJD, Congress, JDU, LJP

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू आहे. दरम्यान, पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे.

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भारतीय जनता पक्ष ४२, JDU ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पक्ष दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांना विरोध केला, परंतु भारतीय जनता पक्षासोबत आपण कायम असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे बिहारमध्ये एनडीएत भाजपाला जास्त जागा मिळाल्या आणि बहुमतासाठी काही मोजक्या जागांची गरज भासल्यास लोकजनशक्ती पार्टी एनडीएच्या बाजूने जाऊ शकते, परंतु एलजेपी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनू देणार का? हा खरा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षाला मिळण्याचीही चर्चा रंगली आहे. पण निवडणुकीआधी कोणत्याही स्थितीत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील हे भारतीय जनता पक्ष नेत्यांचे वक्तव्य कितपत खरं ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होईल.

मागील निवडणुकीत NDA’ला १२५, राजद ८०, काँग्रेस २६, CPI३, एचएएम १, एमआयएम १, अपक्ष ५ असं संख्याबळ आहे. मागील निवडणुकीत जेडीयू आणि राजद यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं, मात्र काही काळातच जेडीयू आणि राजद सरकार कोसळलं आणि जेडीयूने भारतीय जनता पक्षाच्या साथीने राज्यात सत्तास्थापन केली होती.

मात्र यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची ताकद बिहारमध्ये वाढताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष ६५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू ५१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे NDA’मध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ बनत असल्याचं चित्र निकालाच्या कलावरून दिसत आहे.

 

News English Summary: The results of the Bihar Assembly elections will be announced today and counting of votes is underway. Initially, the trend towards Mahagathbandhan is now shifting towards NDA. After the counting of votes starts from 8 am today, the results will start from 9 am to 10 am. With more than 3 crore voters in the country, especially in Bihar, 3,734 candidates are eyeing the results.

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote counting news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x