28 April 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी

Mamata Banerjee

नवी दिल्ली, १७ मे | प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारद स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येताच सीबीआयने पुन्हा एकदा नारदा घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: After the Bengal elections, the TMC has regained power with a majority and the BJP’s dream has been shattered and the Union Home Ministry has been revived. It is noteworthy that just as BJP leaders meet the concerned governors in non-ruling states, the CBI has reportedly agreed to carry out raids through the governors instead of the West Bengal state government.

News English Title: CBI detains four TMC leaders including ministers of Mamata Banerjee cabinet news updates.

हॅशटॅग्स

#CBI(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x