30 April 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Video Viral | डॉक्टरच्या कृरतेचा व्हिडीओ आला समोर, कुत्र्याला कारला बांधून त्याला निर्दयपणे ओढत रस्त्यावर फिरवलं

Viral Video

Video Viral | लोकांमधील कृरता कधीना कधी समोर येतेच. सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे खरचं अन्यायाला वाचा फुटते, मग तो मनुष्य असो अथवा प्राणी. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये, कुत्र्यावर कृरता होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याला कारला बांधून त्याला निर्दयपणे ओढत आहे. रस्यावर घडणारा हा प्रकार पाहून लोक आश्चर्यचकित झाले. कोणताही विचार न करता तो गाडीवाला वेगाना गाडी चालवत होता आणि त्याची कृरता जगाला दाखवत होता. थोडं पुढे गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराने ती कार थांबवली.

कृरतेची सिमा पार :
दरम्यान, हे प्रकरण राजस्थान, जोधपूरमधील शास्त्रीनगर भागातील आहे. कुत्र्याला आपल्या गाडीला बांधून तो वेगाने गाडी चालवत राहिले मागे तो कुत्रा इतर वाहनांपासून आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. कुत्र्यावर होणार अन्याय पाहून लोक गाडी जवळ जमले आणि त्याला यातुन वाचवले. पुढे एनजीओ डॉग होम फाऊंडेशनला कळवण्यात आले आणि कुत्र्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याच्या पायात अनेक फ्रॅक्चर आहेत तर एनजीओने क्रुएल्टी टू अॅनिमल्स कायद्यांतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

डॉग होम फाउंडेशनने व्हिडिओ शेअर केला
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स या व्हिडीला प्रतिक्रिया देत आहेत तसेच त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी असं ही म्हणत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ डॉग होम फाउंडेशनने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कुत्र्यासोबत असे वर्तन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. तो मनुष्य व्यवसायाने डॉक्टर आहे, त्याचे नाव डॉ. रजनीश ग्वाला असे आहे. असे ही सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून त्या डॉक्टरचा परवाना रद्द केला जावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Man was dragging dog with his car video trending on social media checks details 20 September 2022.

हॅशटॅग्स

Doctor Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x