4 May 2025 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा कायदेशीर आणि विषयाला अनुसरून सुज्ञ मार्ग | महाराष्ट्र दौरा सुरू

Maratha reservation

मुंबई, २४ मे | कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता रणशिंग फुंकले आहे. राज्यातील मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे यांनी आज (२४ मे) शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

सुप्रीम कोर्टाने निकाल धक्कादायक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहे, त्याची चाचपणी केली पाहिजे. त्यासाठी मी 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मी या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. तर समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठिस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये हे आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलं. समाज अस्वस्थ आहे. हे मान्य आहे. पण कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

समाजाने 58 मोर्चे काढलेले आहेत. त्यातून सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. आता कितीवेळ लोकांना रस्त्यावर आणायचं? कोरोनाचं वातावरण आहे. त्यामुळे आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही, असं सांगतानाच सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

News English Summary: MP Sambhaji Raje Chhatrapati has now blown the trumpet for the fight for Maratha reservation. Sambhaji Raje has announced that he will visit Mumbai and Marathwada to understand the expectations of the Maratha community in the state.

News English Title: MP Sambhaji Raje Chhatrapati has now blown the trumpet for the fight for Maratha reservation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या