3 May 2025 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
x

फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार? - शिवसेना

Saamana editorial

मुंबई, २८ मे | देशातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला शिवसेनेने आजच्या (२८ मे) सामना संपादकीयमधून लगावला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?
हिंदुस्थानातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार?

मेहुल चोक्सी कोण व त्याचे काय झाले याबाबत आपल्या देशातील सामान्य जनतेला काही पडलेले नाही. तरीही ‘डॉमिनिकन’ देशांत कुठेतरी चोक्सीला बेडय़ा ठोकल्याचा आनंद उत्सव आपल्या देशात साजरा केला जाईल. पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटींच्या घोटाळय़ातील मेहुल हा एक आरोपी आहे. मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे. त्यालाही परत आणण्यासंदर्भात लंडनच्या कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. दुसरे एक महाशय विजय मल्ल्या यांनीही स्टेट बँकेसह अनेक वित्तीय संस्थांना आठ-दहा हजार कोटींचा गंडा घातला असून श्रीमान मल्ल्या हेदेखील लंडनच्या रस्त्यावर फिरत आहेत.

अनेक सार्वजनिक उपक्रम, जे पंडित नेहरूंच्या काळात मेहनतीने उभारले गेले, ते सर्व उद्योग विकले जात आहेत किंवा नव्या ईस्ट इंडिया कंपनीला चालवायला दिले गेले आहेत. एअर इंडियाचा बाजार जाणीवपूर्वक उठवला गेला. भारतीय रेल्वे भविष्यात आपली राहणार नाही. तेल कंपन्यांचे सौदे पडद्यामागून सुरू आहेत. बाजूची चीन, बांगलादेशसारखी राष्ट्रे त्यांचे ‘जीडीपी’, दरडोई उत्पन्न वाढवत आहेत, पण हिंदुस्थानात कोरोनामुळे ‘डोकी’ कमी करण्याचा खाटीकखाना उघडला आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

 

News English Summary: We think we should wait a little longer. If Facebook, Twitter, WhatsApp are banned in such a hurry, how will the devotees celebrate the capture of Mehul Choksi and his extradition to India? Shiv Sena has made such a statement in today’s match editorial.

News English Title: Shivsena Saamana Newspaper Editorial over Facebook Twitter ban news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या